
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर प्रहार
नारी शक्ती विधेयकाला काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी विरोध करत महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली आहे. ज्या ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणामध्ये अडथळे आणले त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील, या पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करत त्यांचा खरा चेहरा समोर आणला असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी विरोधी पक्षांवर प्रहार केले.ते लाईव्हमध्ये बोलत होते.
महिला आरक्षण आणि मतदारसं पुनर्रचना संबंधित 131 वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत आपली भूमिका मांडली. काँग्रेसने इतिहास रचण्याचा आणि महिलांच्या बाजूने उभे राहण्याची संधी गमावली असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.भारतीय महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्यात आला. इच्छां महिलांना रोखण्यात आलं, आमच्यासाठी देशहित सर्वात प्रथम आहे. पण काही लोकांसाठी पक्षहित हे सर्वात मोठं होतं, त्यावेळी देशातील महिलांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. यावेळीही असंच काहीतरी झालं. काँग्रेस, समाजवादी, डीएमके यांच्यामुळेही आता असंच घडलं. देशातील कोट्यवधी महिला संसदेकडे डोळे लावून बसल्या होत्या. ज्यावेळी महिलांच्या हितासंबंधी संसदेत प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांच्या अधिकारांवर गदा आली त्यावेळी काँग्रेस सारख्या परिवारवादी पक्ष टाळ्या वाजवत होते.
ज्यावेळी महिलांच्या अधिकारांवर गदा येते त्यावेळी त्याचा बदला घेतला जाईल. नारी शक्ती वंदन विधेयकाला ज्या लोकांनी विरोध केला, त्यांनी महिलांना गृहीत धरण्याची चूक केली. देशातील महिलांना विरोधकांची भूमिका समजली आहे. त्याचा परिणाम आता भोगावा लागणार आहे. नारी शक्ती वंदन बिल हे प्रत्येकाला काहीतरी देणारं होतं, कुणाचेही काहीही काढून घेणारं नव्हतं. गेल्या 40 वर्षांपासून प्रलिंबित असलेलं ते बिल होतं.
या माध्यमातून एकविसाव्या शतकातील महिलांना नवीन संधी देणारे आणि त्यांच्या वाटेतील अडचणी दूर करणारे होते. देशातील अर्ध्या लोकसंख्येला त्यांचा अधिकार देणारा तो प्रयत्न होता. दरम्यान, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचं 131 वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत एकमतानं नामंजूर झालं आहे. यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. विधेयकाच्या बाजूनं 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली त्यामुळे हे विधेयक पास झालं नाही.




