महात्मा फुले जयंती द्विशताब्दी समितीत पद्मश्री भि. रा. इदाते यांची निवड


महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात येणार्‍या उच्चस्तरीय समितीत पद्मश्री भि. रा. इदाते यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध घटकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दादा इदाते यांच्या दीर्घकालीन समाजसेवेचा गौरव म्हणून ही निवड मानली जात आहे.
११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२८ या कालावधीत महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी केंद्र सरकारने या उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या समितीत देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, अनेक केंद्रीय मंत्री, खासदार तसेच विविध केंद्रीय आयोगांचे अध्यक्ष यांचा सहभाग आहे. या मान्यवरांच्या सानिध्यात देशव्यापी स्तरावर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रस्ताव व जयंती वर्ष साजरी करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button