भोंदूबाबा अशोक खरात याची चिपळुणातही मालमत्ता असल्याचा संशय, चिपळूणला दिली होती भेट


महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात हा चिपळूणमध्ये एका मोठ्या व्यवहारासाठी येऊन गेला असल्याचे अधिकृत वृत्त हाती आले आहे. चिपळूण बरोबरच रत्नागिरी आणि राजापुरातही खरातने याच व्यवहारासाठी चाचपणी केली होती, असेही विश्वसनीय सूत्रांनी ठामपणे सांगितले. संपूर्ण देशात खरात प्रकरण सध्या जोरदार गाजते आहे. तोच भोंदू खरात चिपळूणला येऊन गेल्यामुळे त्याचे तळकोकणशी कनेक्शन उघड झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले असा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सध्या अटकेत आहे.
अत्याचार, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रींग असे बारापेक्षा अधिक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आणि एसआयटीने अधिक अधिक सखोल तपास सुरू केल्यामुळे खरातचे एक एक कारनामे उघड होऊ लागले आहेत. त्यातच कोकणातील तसेच ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील बड़े नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार यांची खरात सोबतची छायाचित्रेही व्हायरल झाल्यामुळे खरात हा आपल्यासोबत किती जणांना अडकविणार याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. कोकणातील दोन बडे नेते खरातच्या संपर्कात होते, असे आरोप होत आहेत.
त्यामुळे खरातची कोकणात गुंतवणूक असावी अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पनवेल परिसरात त्याच्या जमिनी आहेत अशी माहिती नुकतीच उजेडात आली. त्या व्यतिरिक्त कोकणात त्याची कुठे कुठे गुंतवणूक किंवा मालमत्ता आहे याचा सुगावा लागत नव्हता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button