
चीज अॕनालॉगचा मेन्यूकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर स्पष्ट उल्लेख बंधनकारकहाॕटेलधारकांसाठी ३० एप्रिल डेडलाईन
रत्नागिरी, दि. 15 ) : चीज अॕनालॉगचा वापर करून अन्न पदार्थ तयार करीत असलेल्या रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांना चीज अॕनालॉगचा मेन्यूकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड इत्यादी वरती दि. 30 एप्रिल 2026 पर्यंत तसा स्पष्ट उल्लेख नमूद करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन (म.रा.) विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांनी निर्देश दिले आहेत.
दिनांक 1 मे 2026 नंतर ज्या आस्थापनांमध्ये चीज अॕनालॉगचा वापर करून अन्न पदार्थ तयार केले जातात व तेथील मेन्युकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड इत्यादी वरती चीज अॕनालॉग चा उल्लेख स्पष्टपणे केला नाही, असे निदर्शनास आल्यास संबंधित रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमने अंतर्गत अन्न व औषध प्रशासन (म.रा.), रत्नागिरी द्वारे कठोर कारवाई येईल.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम १८ (२) (e) नुसार उपभोक्त्त्यांना ते जे अन्न खातात त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी अन्न पदार्थातील घटकपदार्थविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके (Labelling and Display Regulation) २०२० मधील Chapter ३ मधील नियमन ९ (६) नुसार अन्न व्यवसायीकाने अन्न पदार्थाची ग्राहकांना विक्री करताना, पोषण संबंधित माहिती आणि किंवा/त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
सर्व रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्ट फूड विक्रेते यांनी आपले चीज अॕनालॉग चे उत्पादक/पुरवठादार यांना चीज अॕनालॉगचा विक्री/पुरवठा करताना Food Safety and Standards Act, २००६ च्या कलम २३ मधील तरतुदीनुसार अन्नपदार्थाचे पॅकेजिंग व लेबलिंग भ्रामक अथवा दिशाभूल करणारे नसावे व अन्नपदार्थाचे खरे स्वरूप स्पष्टपणे नमूद करणारे असावे.
Food Safety and Standards (Labelling and Display) Regulations, २०२० (General Labelling Requirements) नुसार विक्री बिलावर चीज अॕनालॉग असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.



