लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आलेल्या डॉ. कांचन मदार या अवैधरित्या गर्भपात करत असल्याचा संशय


लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आलेल्या डॉ. कांचन मदार या अवैधरित्या गर्भपात करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. मदार वैद्यकीय अधिकारी असलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात २०२० पासून गर्भपाताच्या (एमटीपी) गोळ्यांचा साठा उपलब्ध नव्हता, असे आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात आढळले आहे. त्यामुळे गर्भपातासाठी डॉ. मदार कुणाकडून गोळ्या उपलब्ध करून देत होत्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून अवैध गर्भपाताचा संशय आता व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालातून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (४८, रा. पागमळा, चिपळूण) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ जून रोजी सायंकाळी रंगेहाथ पकडले या प्रकरणातील तक्रारदार महिला गरोदर होत्या आणि त्यांना गर्भपात करावयाचा होता. याकरिता त्यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मदार हिची मेट घेतली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button