
राजिवडा खाडीतील गाळ तात्काळ काढा, पालकमंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना
रत्नागिरी गेल्या अनेक वषर्षापासून प्रलंबित असलेल्या राजिवडा खाडीतील गाळ काढण्याच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी कवळ औपचारिक शुभारंभासाठी काम थांबवून ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
राजिवडा खाडीत मोठ्या प्रमाणावर माचलेल्या गाळामुळे मच्छीमारी बीकांना बंदरात ये-जा करणे कठीण होते. ओहोटीच्या वेळी नौका गाळात रुतान बसत असल्याने मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. या प्रश्नावर स्थानिक मच्छीमार संस्था आणि नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वीच या गाळ उपसा प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक मान्यता आणि निधीचा प्रश्न निकाली काढण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब झालेला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारात मच्छीमारांनी पुन्हा हा विषय पालकमंत्र्यांसमोर मांडला. त्यावर उदय सामंत यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाने कोणत्याही सोपस्कारासाठी वेळ घालवू नये. शुभारंभाच्या कार्यक्रमाची वाट न पाहता मशिनरी लावून कामाला गती द्या. यासंदर्भात जर काही तांत्रिक अडचणी असतील किंवा संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी समन्वय साधायचा असेल तर मी स्वतः त्यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावतो, असे स्पष्ट केले होते.www.konkantoday.com




