देवरुख शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, नागरिक हैराण


देवरुख शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास देवरुख बाजारपेठेत भटक्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. बसस्थानक परिसरात नेहमी वावरत असलेल्या कुत्र्यांच्या समूहातील एका कुत्र्याने अचानक आक्रमक होत एकाच वेळी तिघा नागरिकांवर हल्ला करून त्यांना चावे घेत जखमी केले.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली असून,
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी झालेल्या तिघांनी तत्काळ देवरुख येथील सरकारी रुग्णालयात धाव घेत उपचार घेतले. डॉक्टरांनी त्यांना महिनाभर आवश्यक उपचार व लसीकरण घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button