
देखभाल, दुरूस्तीची कामे आता सकाळच्या सत्रात करण्याचे निर्देश
उन्हाळ्यात विशेषतः वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरू आहे. मात्र उन्हाचा तडाखा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत करावीत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी देण्यात आले.
पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देवून देखभाल व दुरूस्तीची कामे राज्यभरात सध्या सुरू आहेत. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा ४ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरूस्तीचे कामे सुरू आहेत. नागरिकांसाठी यापुढे संबंधि दिवशी व वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरूस्तीच काम यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदर्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत. महावितरणच्या देखभाल दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.www.konkantoday.com




