डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलचा डबा घसरला; रेल्वे वाहतूक २५ मिनिटे उशिरा!

डोंबिवली : सोमवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात सी एस एम टी हुन कल्याणला जाणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. सोमवार कामाच्या पहिल्या दिवशी ही घटना घडल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली. या घटनेमुळे

मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिरा धावत होत्या. मुंबईकडे जाणाऱ्या लोकांची वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि पाच वरून सुरळीत सुरू होती. या रिकाम्या लोकलचा कल्याण दिशेकडील तिसरा डबा घसरला. त्यावेळी मोठा आवाज झाला. रेल्वे स्थानकातील प्रवासी आवाज ऐकून सैरभैर झाले. त्यानंतर काही वेळातच फलाट क्रमांक एक वरून कल्याणला जाणाऱ्या लोकलचा डबा घसरला असल्याचे प्रवाशांना समजले. स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या वळणदार मार्गावर ही घटना घडली.

लोकांचा डबा घसरताच या लोकांच्या पाठीमागून येणाऱ्या लोकल एका पाठोपाठ उभ्या राहिल्या. पाठीमागील लोकलमधील प्रवाशांनी डब्यातून खाली उतरून रेल्वे मार्गातून डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकात येणे पसंत केले. यामुळे सकाळच्या वेळेतच रेल्वे मार्ग प्रवाशांनी भरून गेला होता. डबा घसरल्याची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक वाहन आणि दुरुस्ती कर्मचारी अभियंते घटनास्थळी तातडीने दाखल झाले. डबा घसरलेल्या लोकलमधील प्रवासी डब्यातून उतरून इतर लोकलने पुढच्या प्रवासाला निघाले. सोमवारी कामावर जाण्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि लोहमार्ग पोलीस रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले.

लोकलचा डबा घसरलेला फलाट क्रमांक एक वरील रेल्वे मार्ग बंद झाल्याने लोकल फलट क्रमांक एक 1 वरून काढण्यात आल्या. काही लोकल फलाट क्रमांक चार वरून कल्याण दिशेने सोडण्यात आल्या. फलाट क्रमांक एक वरून येणाऱ्या लोकांची वाहतूक ठप्प झाल्याने फलट क्रमांक चार वरील लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडाली होती. एका फलटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची दमछाक होत होती.

दुरुस्ती पथकाने काम हाती घेताच

फलाट क्रमांक एक ए वरून कल्याण दिशेने धावणाऱ्या लोकलचा मार्ग बंद करण्यात आला. या लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरून सोडण्यास सुरुवात झाली. डबा घसरलेले लोकलच्या मागे कल्याण अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या तीन लोकल अडकून पडल्या. या लोकलमधील प्रवाशांनी कोपर आणि डोंबिवली स्थानकात येऊन इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. लोकल उशिरा धावू लागल्याने कल्याण दिशेकडे जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.

https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq?mode=hqctcla

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button