
कोकण मार्गावरून धावणारी मांडवी एक्स्प्रेस २ तास ’लेट’
कोकण मार्गावरून धावणार्या सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेसला बुधवारी २ तासांचा लेटमार्क मिळाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. एक्सप्रेस उशिराने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस २ तास तर सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास ४० मिनिटे उशिराने धावली. तिरुवअनंतपूरम-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे तर बांद्रा-मडगाव एक्सप्रेस १ तास २५ मिनिटे उशिराने पोहचली. दुरांतो एक्सप्रेस १ तास १० मिनिटे विलंबाने धावली.www.konkantoday.com




