
कुर्लीफाटा येथे मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील कुर्ली फाटा टेबल पाईंटजवळ मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार शशिकांत साळुंखे (वय २६, रा. गोळप, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ली फाटा येथील टेबल पॉइंटच्या येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल पुनम ढवळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



