
आठ आधार संच वितरणासाठी नवीन केंद्रे सुरू करण्याबाबत सूचना प्रसिद्ध 28 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत
रत्नागिरी, दि. 21 ) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात 8 आधार संच वितरणासाठी नवीन केंद्रे सुरू करण्याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी आधार संच उपलब्ध झाले असून, त्यानुसार नवीन केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी आपले अर्ज नमुना व पात्रतेचे निकष https://ratnagiri.gov.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी शाखेत दि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आधार प्रकल्प चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
नवीन आधार संच जिल्ह्यातील महसूल मंडळाच्या पुढील ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहेत. गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे मंडळ कार्यालय, राजापूर तालुक्यात भू आणि कोंड्ये त सौंदळ येथे, रत्नागिरी तालुक्यात पाली आणि पावस मंडळ कार्यालयात, संगमेश्वर तालुक्यात मुरडव, खेड तालुक्यात धामणंद आणि मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ मंडळ कार्यालयात प्रत्येकी 1 आधार संच असे 8 संच स्थापन करण्यात येणार आहेत.
अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, NSCIT सुपरवायझर प्रमाणपत्र, जन्मनोंदणी किंवा शाळा सोडल्याचा दाखला, MSCIT/CCC प्रमाणपत्र, आपले सरकार सेवा केंद्र प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र तसेच पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.
000




