अमेरिका-इराण युद्ध थांबणार! ट्रम्प आणि पेझेश्कियान यांच्या ऐतिहासिक शांतता करारावर सह्या!


गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी एक ऐतिहासिक शांतता करार (MoU) झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे जागतिक बाजारावर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर याचे मोठे सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहेत. जी-७ (G7) परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मित्रराष्ट्रांसोबत या कराराच्या तपशिलांवर सविस्तर चर्चा केल्याचेही सांगितले.

‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तील वाहतूक वाढली

फ्रान्समध्ये पार पडलेल्या ‘जी-७’ (G7) परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची माहिती दिली. ते म्हणाले, “या अंतरिम करारामुळे जगावरील मोठे आर्थिक संकट टळले आहे. गेल्या तीन दिवसांत ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तील सागरी वाहतूक कमालीची वाढली असून, मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.”

यावेळी इराणला इशारा देताना ट्रम्प त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत म्हणाले, “इराणी लोक हुशार आहेत, त्यांनी या कराराचा आदर करावा अशी माझी इच्छा आहे. पण जर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा भीषण बॉम्बहल्ला करू.”

काय आहे या ऐतिहासिक करारात?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अंतरिम कराराचे मसुदे समोर आले असून त्यानुसार खालील प्रमुख घडामोडी घडणार आहेत:

  • करारावर स्वाक्षरी होताच इराण आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’चा सागरी मार्ग तातडीने पूर्णपणे मोकळा करेल.
  • इराणला आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कोणत्याही निर्बंधांशिवाय कच्च्या तेलाची विक्री करण्याची परवानगी मिळेल.
  • युद्धानंतर इराणच्या पुनर्उभारणीसाठी सुमारे ३०० अब्ज डॉलर्सचे (सुमारे २५ लाख कोटी रुपये) आर्थिक पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे.
  • इराणच्या अणू कार्यक्रमावर अंतिम तोडगा निघाल्यास, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध मागे घेतील.

६० दिवसांचा अवधी आणि अंतिम बोलणी

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या या स्वाक्षरीनंतर दोन्ही देशांना अंतिम वाटाघाटींसाठी ६० दिवसांचा वेळ मिळणार आहे. या काळात इराणचा अणू कार्यक्रम, शिल्लक असलेले आर्थिक निर्बंध आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम करार केला जाईल. ‘जी-७’ देशांच्या प्रमुखांनीही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राणे जागतिक व्यापारासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

करारानंतरही इराणचे ड्रोन हल्ले सुरूच; अमेरिकेची कारवाई

एकीकडे कराराची प्रक्रिया सुरू असतानाच, दुसरीकडे इराणकडून प्रक्षोभक कारवाया सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन वृत्तसंस्था ‘एनबीसी न्यूज’ (NBC News) ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारपासून इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) कडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांना लक्ष्य करून दररोज रात्री ड्रोन हल्ले केले जात आहेत. तथापि, अमेरिकन लष्कराने हे ड्रोन हवेतच नष्ट करून व्यापारी जहाजांचे रक्षण केले आहे.

युद्धाचा जगाला बसला होता मोठा फटका

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या एअरस्ट्राईकनंतर या भीषण युद्धाची ठिणगी पडली होती. या युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनाचे दर गगनाला भिडले होते, महागाईचा भडका उडाला होता आणि विकसनशील देशांसमोर अन्नधान्याच्या पुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले होते. अब या नव्या करारामुळे जागतिक बाजारपेठेला आणि पर्यायाने भारतालाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button