
या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस, 20 जूनला पाऊस नाहीच
मागील 10 दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल रखडली आहे. मॉन्सून अरबी समुद्रातच आहे. अजिबात मॉन्सूनची प्रगती नाही. राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. 18 जून उजाडला तरीही मॉन्सूनची अजिबात वाटचाल नाही.सुरूवातीला सांगण्यात आले की, राज्यात मॉन्सून 15 जूनला दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर 20 जूनला मॉन्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला. आता जून महिनाच कोरडा जाण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील मॉन्सूनची सध्याची हालचाल बघता 20 जूनला मॉन्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे. मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता अजून 8 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. जर स्थिती अशीच राहिली तर थेट मॉन्सूनच्या पावसासाठी जुलै महिनाही उजडू शकतो.मॉन्सूनची सध्याची स्थिती बघता हे स्पष्ट आहे की, मॉन्सून पुढील 8 दिवस राज्यात नसणार आहे. पेरण्या रखडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पाणी पातळी खाली जात आहे.ज्यामुळे मोठे संकट आहे.धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे. त्यामध्येच आज राज्यातील अनेक भागात उष्णता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दिलीये. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात उष्ण वातावरण राहणार आहे. हवामानात बदल होत आहे. सकाळी काळे ढग अनेक भागात बघायला मिळतात. मात्र, पाऊस काही होत नाही. दुपारी उष्णता वाढत आहे. त्यामध्येच प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. या एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होण्याचाच अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, अजून साधा मॉन्सून राज्यात दाखल झाला नाही. चिंता वाढत आहे. पुढील काही दिवस स्थिती अशीच राहिली तर गंभीर संकट निर्माण होऊ शकते.




