अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न


अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. शनिवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प हे पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीला उपस्थित होते.यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुरक्षा दलांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत हा कट उधळून लावला आहे. सुरक्षा एजन्सीने एका हल्लेखोराला जागीच ठार केलं आहे. तर अन्य एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सिक्रेट एजन्सी आणि मेट्रोपोलिटन पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसकडून दरवर्षी कॉरस्पॉन्डंट्स डिनरचं आयोजन करण्यात येतं. परंपरेनुसार शनिवारी रात्री देखील व्हाईट हाऊसकडून या डिनरचं आयोजन केलं होतं. यासाठी अनेक पत्रकार आणि प्रशासकीय हाय प्रोफाइल लोक उपस्थित होते. हे डिनर सुरू असताना अचानक गोळीबाराची घटना घडली. या पार्टीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलोनिया देखील उपस्थित होत्या. गोळीबाराची घटना घडताच सुरक्षा दलाने ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नीला सुरक्षित स्थळी हलवलं आहे.व्हाइट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरच्या एका स्वयंसेवकानं ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला सांगितलं की, संशयित बंदूकधारी टेरेसवरील एका प्रवेशद्वाराजवळील कमी देखरेख असलेल्या भागात एक मोठं शस्त्र असेंम्बल करत असल्याचं दिसलं. त्यानंतर त्याने गोळीबार करून बॉलरूमच्या (जिथे डिनर पार्टी सुरू होती) दिशेने धाव घेतली. जिथे आरोपीनं आपली बंदूक असेम्बल केली, ती एक स्टोअर रूम होती. याठिकाणी बार कार्ट्स ठेवण्यात आले होते. तसेच तिथे कोणतीही सुरक्षा नव्हती.

प्रत्यक्षदर्शींनी पुढे सांगितलं की, “हल्लेखोर त्या खोलीत होता. त्याने एका आपल्या बॅगेतून काही तत्सम वस्तू बाहेर काढल्या आणि शस्त्र तयार केलं. हे शस्त्र लांब आकाराचं होतं. मात्र सर्वसाधारण बंदुकीसारखे दिसत नव्हते. संशयित खोलीत शस्त्र हाताळत असताना सुरक्षेच्या नजरेआड होता आणि त्यानंतर तो अचानक मुख्य कार्यक्रमाच्या दिशेनं गेला.

त्यानंतर हल्लेखोराने अनेक दिशांना गोळीबार करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे पाहुणे आणि कर्मचारी पळून जाण्यासाठी धडपडू लागले. त्याने किमान १० फायरींग केले, असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली आणि हल्लेखोराला ठार केलं. यावेळी सुरक्ष यंत्रणेनं अन्य एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. हा हल्ला नेमका कुणी केला? हल्ल्यामागचा हेतू काय होता? यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे का? याचा सविस्तर तपास सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button