
मुंबई-गोवा महामार्गावर खैराची तस्करी
पोलादपूर तालुक्यातील खैरतस्करांवर वनविभागाने पुर्णपणे नियंत्रण मिळविले असताना पोलादपूर येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वनउपवन तपासणी नाक्यावर चिपळूणच्या दिशेने जाणारा ट्रक 430 खैराचे सोलीव तुकडे घेऊन जाताना जप्त करण्यात आला आहे.बुधवार, दि. 3 जुलै 2024 रोजी रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, सहायक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव, महाड परिक्षेत्र वनअधिकारी राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली वनउपज तपासणी नाका – पोलादपूर येथे मुंबई गोवा महामार्गावरून चिपळूणच्या दिशेने जाणारा ट्रक (क्र. जीजे 17 युयु 9837) ची तपासणी पोलादपूरच्या स्थानिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली असता ट्रकमध्ये खैराचे अंदाजे 68 हजार 572 रूपये किंमतीचे 430 बिनपासी सोलीव तुकडे असा मुद्देमाल मिळाल्याने ट्रकचालक सिद्दिक अब्दूलरहीम वाढेल रा. गोधरा, ता. जिल्हा- गोधरा (राज्य गुजरात) व अन्य एक इसम यांच्याविरूध्द कारवाई करून ट्रकदेखील जप्त करण्यात आला.




