मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी आज गुरुवारी प्रत्यक्ष मतदान ,चुरशीमुळे मतदानाचा टक्का वाढणार!


मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी आज गुरुवारी प्रत्यक्ष मतदान पार पडेल. गेल्या बारा दिवसांतील जाहीर सभा, मुलाखती आणि आरोप – प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.प्रचाराच्या या सर्वपक्षीय झंझावातानंतर आता आपला हक्काचा मतदार, प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत पोहचावा, यासाठी उमेदवार आणि पक्षांची तयारी सुरू आहे. त्यासाठी बूथस्तरावर कार्यकर्त्यांची यंत्रणा उभारली जात आहे. मतदानाचा टक्का आणि निकालाचे समीकरण लक्षात घेत हक्काचा मतदार उतरविण्याची रणनीती आखली जात आहे. विशेषतः प्रतिष्ठेची बनलेल्या मुंबईतील लढतीतील मतदानाची टक्केवारी कायम राहणार की त्यात घट होणार, याबाबत उत्सुकता आहे.

मुंबई महापालिकेच्या मागील पाच निवडणुकीतील मतदानाचा टक्का लक्षात घेतल्यास 2017 च्या निवडणुकीत सर्वाधिक 55.28 टक्के मतदान झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button