चिपळूणचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी केली गोवळकोट जॅकवेल, नदीपात्राची पाहणी


चिपळूण शहरातील गोवळकोट माप भागातील नागरिकांना दीर्घकाळापासून भेडसावणार्‍या मचूळ व अशुद्ध पाण्याच्या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सोमवारी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच ऍक्शन मोडमध्ये काम सुरू केले आहे. सोमवारी नगर परिषदेच्या संबंधित अधिकार्‍यांसह प्रत्यक्ष गोवळकोट जॅकवेल व नदीपात्राची पाहणी करत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि तत्काळ उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले. गोवळकोट-माप परिसरात पुरवण्यात येणार्‍या पाण्यामध्ये मचुळपणा व अशुद्धता आढळून येत असल्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button