
आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई याच्या प्रतिष्ठित कला स्पर्धेत सावर्डेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे यश
आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई याच्या प्रतिष्ठित कला स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबईच्यावतीने घेतली जाणारी ही स्पर्धा प्रतिष्ठित असते. यात अनेक कलाकार सहभागी होतात. यावर्षी या कला स्पर्धेत महाविद्यालयातील प्राध्यापक रुपेश सुर्वे, विद्यार्थी सार्थक आदवडे, पंकज सुतार, विशाल गोवळकर, यशोदीप घुले यांची निवड झाली आहे.
ही निवड सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे येथे दिल्या जाणार्या दर्जेदार कला शिक्षणाची आणि सातत्यपूर्ण सृजनशीलतेचा पावती असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, पूजा निकम, अनिरुद्ध निकम, कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com




