
संगमेश्वरवासियांना मोठा दिलासा : मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनचा थांबा मंजूर
खेड : मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर झाल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी या गाडीला संगमेश्वर येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.
या थांब्यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने सातत्याने कोकण रेल्वेकडे पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच पद्मश्री गजानन माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोकण रेल्वेचे CMD संतोष कुमार झा यांच्यासमोर हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला होता. त्या वेळी लवकरच थांबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
या सर्व प्रयत्नांना अखेर यश आले असून, संबंधित गाडीच्या संगमेश्वर थांब्याबाबत अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे संगमेश्वर व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




