डेरवण रुग्णालयात १५ रोजी “दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रिया शिबिर

रुग्णांनी लाभ घेण्याचे रुग्णालय प्रशासनाचे आवाहन

चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात १५ मार्च रोजी दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी मुंबईतील नामवंत डॉ. मंदार गाडगीळ, डॉ. निधी खंडेलवाल व डॉ. अरबाझ मोमीन हे उपस्थित राहणार आहेत.

हर्निया म्हणजे रुग्णाच्या पोटातील लहान आतडे हे जांघेतील कमकुव भागातून लघवीच्या जागेकडे सरकते आणि हर्नियाची गाठ निर्माण होते. या गाठीत काही वेळा आतील आतड्याला पिळ पडला तर रक्त पुरवठा कमी होऊन आतड्याचे गॅंगरीन होऊ शकते व रुग्ण सिरियस होऊ शकतो, अशा रुग्णाचे वेळीच ऑपेरेशन करणे गरजेचे असते. त्यामुळे हि गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच जर हॅर्निया काढला तर शस्त्रक्रिया सोपी, सहज होते. आता तर दुर्बीण वापरल्यामुळे अगदी छोटा छेद घेऊन हॅर्निया काढणे सहज शक्य झाले आहे. या पद्धतीने रुग्ण लवकर बरा होतो.
मुंबईतील नामवंत सर्जन डॉ. मंदार गाडगीळ, डॉ. निधी खंडेलवाल व डॉ. अरबाझ मोमीन ह्यांचा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेत हातखंडा आहे. कोकणातील रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वालावलकर रुग्णालयातर्फे करण्यात आलेले आहे. इच्छुक रुग्णांनी नाव नोंदणी करून दुर्बिणीद्वारे हॅर्निया शिबिराचा लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button