विकास कामात दिरंगाई करणार्‍या ठेकेदारांची नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांचेकडून झाडाझडती


राजापूर तालुक्यात शासनाच्या माध्यमातून आ. किरण सामंत यांच्या पुढाकारातून लाखो रूपयांची विकासकामे मंजूर व मार्गी लागूनही ती स्वीकारून कामे सुरू करण्यासाठी दिरंगाई करणार्‍या ठेकेदारांची सोमवारी नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांनी खास बैठकीत कडक झाडाझडती घेतली व अंतिम इशारा देत असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला उपनगराध्यक्ष विनय गुरव, सत्ताधारी गटनेते ऍड. जमीर खलिफे, विरोधी गटनेते ऍड. राहुल तांबे तसेच मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्यासह उभय गटातील नगरसेवक उपस्थित होते.
अनेक महिने वर्कऑर्डर देऊनही कामे सुरू न करणार्‍या काही ठेकेदारांमुळे न. प.तील सर्वच लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांना नागरिकांच्या असंतोषाचा नाहक सामना करावा लागत आहे यासाठी अशा बेपर्वा ठेकेदारांची झाडाझडती घ्यावी अशी मागणी नगरसेवक महेश शिवलकर यांनी आ. सामंत, नगराध्यक्षा सौ. खलिफे तसेच मुख्याधिकारी श्री. कुंभार यांना स्वतंत्र निवेदन देऊन केली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button