
सहावी प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 202613 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये परीक्षा
रत्नागिरी, दि. 5 ) : इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 दिनांक 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत होणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.बसवराज यांनी कळविले आहे.
000




