फडणवीस सरकारच्या महत्वाच्या निर्णयामुळे मच्छीमारांना दिलासा

कृषी दर्जा मिळाल्यामुळे आता मच्छीमारांनाही मिळणार वीज दरात सवलत

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला सरकारचा प्रतिसाद

मच्छिमारांच्या कष्टाच्या जीवनाला मत्स्य विभागाचा मोठा आधार

मुंबई : राज्याच्या मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये आता शेतकऱ्यांप्रमाणेच राज्यातील मच्छीमारांनाही वीज दरात सवलत मिळणार आहे. मत्स्य व्यवसायाला ‘कृषी दर्जा’ बहाल केल्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय लागू करण्यात आला आहे.

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मागणीनुसार हा निर्णय शासनाने जारी केला आहे. या निर्णयामुळे मत्स्य व्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदरात सवलत लागू होणार आहे. यामुळे राज्यातील मत्स्य उद्योगाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.

या मच्छिमारांचे भविष्य सुकर करणाऱ्या निर्णयामधे वीज दरातील या सवलतीचा लाभ हा मच्छीमार, मत्स्य संवर्धक, मत्स्य व्यवसायिक आणि मत्स्यकास्तकार म्हणजेच मत्स्य शेती करणाऱ्यांना मिळणार आहे.

या निर्णयानुसार, मत्स्य व्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित मत्स्य व्यवसाय प्रकल्पांची राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळ अंतर्गत नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ना. राणे उचललेल्या या पावलामुळे मत्स्य क्षेत्रत मोठे सकारात्मक बदल होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button