शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रत्नागिरी शहर मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रत्नागिरी शहर मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामुबल्य असून प्रवेशिका ६ सप्टेंबरबर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ७७७७, ५५५५ आणि ३३३३ रुपये रोख, सन्मानचिन्ह दिले जाईल. उत्तेजनार्थ बक्षिसेही रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह स्वरूपाची असतील. स्पर्धेसाठी नितीन तळेकर (8275635222), श्रीकृष्ण चव्हाण (9423291824), अमित खडसोडे (8007233723), मनीषा बामणे (8788932226), सेजल बोराटे (7507559335) किंवा विजया घुडे (9370259104) यांच्याशी संपर्क साधावा. सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन शिवसेना रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले आहे.