
भंडारपुळे येथे चोरटया दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः तालुक्यातील भंडारपुळे येथील समुद्रकिनारी जंगलमय पायवाटेवर चोरटी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४५० रुपयांची चार लिटर दारु जप्त केली. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र राजाराम रामाणी (वय ४९, रा. कुणबीवाडी, भंडारपुळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास भंडारपुळे येथील एका हॉटेल समोरील समुद्रकिनारी जंगलमय पायवाटेवर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित जयेंद्र रामाणी हे भंडारपुळे समुद्रकिनारी जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीची चोरटी दारु विक्री करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस शिपाई आदीत्य अंकार यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




