भोंदू खरातची कोकणात रायगड जिल्ह्यातही करोडोंची मालमत्ता असल्याचे उघड


स्वतःला ’कॅप्टन’ म्हणून सादर करत भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यवधींची संपत्ती उभारल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात यांच्या कथित काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता पनवेल तालुक्यातील शिरढोण गावापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरात यांनी कथित काळी कमाई गुंतवण्यासाठी शिरढोण गावातील जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या. विशेष म्हणजे या जमिनी थेट त्यांच्या नावावर न घेता नातेवाईकांच्या नावावर घेतल्याचे समोर आले असून संबंधित सातबार्‍यावरही त्याची नोंद झाल्याची माहिती आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button