महाराष्ट्रातील 2 कोटी, दिल्लीतील 47 लाख मतदारांचे नाव SIR ड्राफ्टमधून गायब,


महाराष्ट्र आणि दिल्लीत आज स्पेशल इन्टेन्सिव रिव्हिजन म्हणजे SIR अंतर्गत ड्राफ्ट वोटर रोल म्हणजे प्रारुप मतदार यादी जारी करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन केलेली पडताळणी आणि डिजिटायजेशनसाठीचा फॉर्म जमा न होणे आणि इतर तांत्रिक कारणामुळे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे या ड्राफ्ट लिस्टमध्ये आलेली नाहीयेत.गैरहजर, स्थलांतरित, मृत, ड्युप्लिकेट, विदेशी आणि इतर श्रेणीतील नागरिकांची नावे या यादीतून कापण्यात आली आहेत.

दिल्लीत एकूण 1 कोटी 45 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे यादीतून बाहेर आहेत. सुमारे 97 लाख 53 हजार 507 मतदारांचा रेकॉर्डच डिजिटाईज झाला आहे. तर महाराष्ट्रात एकूण मतदारांपैकी सुमारे 2 कोटी 7 लाख मतदारांचे नाव ड्राफ्ट रोलमध्ये नाहीयेत. या मतदारांनी फॉर्म जमा केलेला नाही त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड डिजिटाईज झालेला नाही.

आता काय कराल?

ज्या लोकांची नावे ड्राफ्ट वोटर लिस्टमध्ये नाही, त्यांची चिंता करण्याची गरज नाही. ज्यांची नावे मतदार यादीत नाही त्यांनी आजपासून म्हणजे 31 ऑगस्टपासून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आपला दावा किंवा हरकत सादर करायची आहे. या दाव्यांची निस्तरण प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदाता यादी जाहीर केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button