बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार गौतमला उत्तरप्रदेशमधून अटक

मुंबई:- –राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार गौतमला आज एसटीएफ उत्तर प्रदेश आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत उत्तरप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. एसटीएफ टीमचे नेतृत्व प्रमेश कुमार शुक्ला आणि जावेद आलम सिद्दीकी करत होते. अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही शिवकुमारला आश्रय देणे आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

ज्याने सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता, तो मुख्य शूटर शिवकुमार गौतम हा गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आला पोलिसांना यश आलं आहे. आरोपीकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार गौतमला अटक करण्यात आली आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या बहाराईच येथून अटक करण्यात आली आहे.* शिवकुमार गौतम सोबत आणखी चार आरोपींना देखील पोलिसांनी अटक केलं आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश एस टी एफ ने ही संयुक्त कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश एस टी एफच्या पथकासोबत मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे सहा अधिकारी आणि इतर पंधरा जण या संयुक्त कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींना आता मुंबईला आणलं जात आहे. पोलीस तपासात आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button