रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे दुचाकी घसरली कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल


रत्नागिरीतालुक्यातील कासारवेली – साखरतर येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोरील रस्त्यावरील खडीमुळे झालेल्या अपघातप्रकरणी अधिकाऱ्यासह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. ठेकेदार खान व अधिकारी पवल ( पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिटायर्ड उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले (रा. खोपटकरवाडी, बसणी, ता. रत्नागिरी) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ ए डब्ल्यू ६८०६) ही बसणी ते रत्नागिरी अशी घेऊन जात असताना संशयित खान यांनी गटाराचे काम पूर्ण झालेले असतानाही पडलेली मातीखडी न काढल्यामुळे भोसले यांची दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला.

या अपघातामधे ते जखमी झाले. तसेच दुचाकीचे अडीच हजाराचे तसेच हातातील घड्याळ तुटून १ हजाराचे नुकसान झाले. या प्रकरणी भोसले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यासह केला ठेकेदारावर गुन्हा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button