देवरूखातील सार्वजनिक शौचालयात महिनाभर पाणीच नाही, नागरिकांचे हाल

देवरूख शहरातील पोलीस कर्मचारी वसाहतीशेजाजरी असणारे सामुदायिक शौचालय अस्वच्छ असून गेले महिनाभर पाणी नसल्याचे चित्र आहे. याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगर पंचायतीने लवकरात लवकर सामुदायिक शौचालयाची साफसफाई करून पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.देवरूख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सर्व शासकीय कार्यालये देवरूख येथे असल्याने तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून हजारोंच्या संख्येने नागरिक दररोज कामानिमित्त देवरूखात येतात. तहसील कार्यालय, कोर्ट, पोलीस स्टेशन, ग्रामीण रूग्णालय, भूमी अभिलेख, पंचायत समिती परिसरात पोलीस वसाहतीशेजारी एकमेव सामुदायिक शौचालय आहे. येथे महिला व पुरूषांची ये-जा सुरू असते. मात्र हे शौचालय अस्वच्छ आहे. गेले महिनाभर या शौचालयात पाणी नसल्याचे विदारक चित्र आहे. यामुळे शौचालय परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांनी याकडे पाठ फिरवली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button