कोकण मार्गावर ८ रेल्वेगाड्यांना लेटमार्क

कोकण मार्गावरून धावणार्‍या ८ रेल्वेगाड्यांना शुक्रवारी लेटमार्क मिळाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. कोकण मार्गावर धावू लागल्यापासून विलंबाने धावणारी मडगांव-उधना उन्हाळी स्पेशल शुक्रवारीही २ तास विलंबाने धावली. शुक्रवारी आरवली-रत्नागिरी विभागादरम्यान घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे वेळापत्रक बिघडल्याचे समजते.उन्हाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणार्‍या रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. त्यात विलंबाने प्रवासाची भर पडत आहे. ०९५८ मडगांव-उधना स्पेशल २ तास १५ मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. ११०९९ एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे तर १२१३३ सीएसएमटी-मंगळूर एक्सप्रेस १ तास विलंबाने रवाना झाली. या पाठेपाठच १२४३१ तिरूवनंतपूरम-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस १२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसही १ तास उशिराने मार्गस्थ झाली. २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस १ तास २० मिनिटे तर २०९२३ तिरूवनेलवेली हमसफर १ तास १५ मिनिटे विलंबाने धावली. ५०१०४ रत्नागिरी-दिवा पॅसेंजरही १ तास विलंबाने रवाना झाली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button