रत्नागिरीजवळ प्रदूषणविरहित प्रकल्प सुरू करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची मागणी

रत्नागिरी :रत्नागिरी शहराजवळ असलेल्या स्टरलाईटच्या जागेत प्रदूषणविरहीत प्रकल्प सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी खासदार सुनिलजी तटकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. शहराच्या शिरगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टरलाईट कंपनीने ५५० एकर जागा घेतली आहे. हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याने रत्नागिरीवासियांनी विरोध करून हा प्रकल्प दुसरीकडे हलविण्यास कंपनीला भाग पाडले होते. सध्या ही जागा कंपनीकडे आहे. कंपनीने या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभा केलेला नाही. त्यामुळे या जागेत प्रदूषणविरहीत प्रकल्प सुरू झाल्यास रत्नागिरीतील स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होवू शकणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button