बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे यांच्या नावाने जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष -नामदार उदय सामंत
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आज सकाळीच निधन झालेले बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे यांच्या नावाने जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, अशी माहिती नामदार उदय सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
डॉक्टर मोरे यांचे आज पहाटे करोनामुळे निधन झाले. त्याबद्दल शोक व्यक्त करताना सामंत म्हणाले की, डॉ. मोरे म्हणजे जिल्हा रुग्णालयाचा कणा होता. राज्यात प्रथमच सहा महिन्यांचे कोरोनाबाधित बाळ डॉ. मोरे यांच्या प्रयत्नामुळे वाचले होते. ज्या कोरोनाविरुद्ध ते लढले, त्याच आजाराने ते गेले हे दुर्दैव आहे, असे सामंत म्हणाले.
त्यांचे कार्य जिल्हा रुग्णालयात यापुढे येणाऱ्या आणि सध्या असलेल्या डॉक्टरांसमोर दीपस्तंभाप्रमाणे राहावे, यासाठी रुग्णालयातील एका कक्षाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे
www.konkantoday.com