केबीबीएफ व्यावसायिक संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास ठाकुरदेसाई

रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशन म्हणजेच केबीबीएफ या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी मैत्री ग्रुपचे उद्योजक सुहास ठाकुरदेसाई यांची निवड झाली आहे. तसेच सचिवपदी अभिजित करंबेळकर आणि खजिनदार म्हणून गीता भागवत आणि सदस्य म्हणून अॅड. गौरव महाजनी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच केबीबीएफ ग्लोबलच्या उपाध्यक्षपदी योगेश मुळ्ये यांची निवड झाली आहे.मैत्री ग्रुपचे संचालक सुहास ठाकुरदेसाई हे काही वर्षांपासून हॉटेल, लॉजिंग, पर्यटन, मंगल कार्यालय अशा विविध व्यवसायात आणि विविध सामाजिक कार्यातही हिरीरीने सहभाग घेतात. यापूर्वी त्यांच्या हर्षा हॉलिडेजला पर्यटन संचालनालयाला (उपसंचालक कार्यालय, कोकण विभाग) जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोकणचे पर्यटन वाढवणे, कोकणात जास्तीत जास्त पर्यटक येण्याकरता मुंबई, पुणे येथे वेगळयावेगळया प्रदर्शनात सहभाग घेतला. नंतर रत्नागिरीमध्ये पर्यटकांचा मुक्काम वाढण्यासाठी हर्षा स्कुबा डायव्हिंगची प्रथमच सुरवात केली. याला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. गाईड प्रशिक्षण कार्यक्रम, कोकणी खाद्यपदार्थांची स्पर्धा, पर्यटन परिषद, टुर ऑपरेटर व्हिजिट असे अनेकविध उपक्रम राबवले आहेत. हॉटेल असोसिएशन, मंडप डेकोरेटर्स असोसिएशन यातही सक्रिय आहेत. कऱ्हाडे ब्राह्मण संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, सुवर्णसूर्य फाउंडेशन अशा संस्थांमध्येही श्री. ठाकुरदेसाई जबाबदारीने कामकाज सांभाळत आहेत.केबीबीएफ संघटनेचे ठाणे, डोंबिवली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि नागपूर असे सात विभाग मिळून सुमारे ३२५ व्यावसायिकांचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील हे व्यावसायिक एकमेकांना अनेक संदर्भ, संपर्क आणि व्यवसाय देत असतात. संघटनेतर्फे दर सहा महिन्यांनी सगळ्या विभागांची एकत्र केबीबीएफ ग्लोबल मीट आयोजित केली जाते. त्यामध्ये व्यवसायाच्या नवीन संधी किंवा सद्यःस्थितीत येत असलेल्या अडीअडचणी यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. अनेक यशस्वी व्यावसायिक आपले अनुभव सादर करतात आणि या माध्यमातून अनेक नवीन ओळखी होऊन आपला व्यवसाय वाढायला मोठी मदत होते.याव्यतिरिक्त सर्व सदस्यांचा एक ग्लोबल व्हॉटस अॅप ग्रुप आणि वेबसाइटच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. या या संघटनेचा एक भाग अर्थात रत्नागिरी विभागाचे सदस्य होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेची यावर्षीची नोंदणी सुरू झाली असून नोंदणीची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. ही नोंदणी या आर्थिक वर्षाकरिता असून तीन हजार रुपये सदस्यत्व शुल्क आहे. अधिकाधिक कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी संघटनेचे सदस्य व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहिती संघटनेच्या https://kbbfglobal.org/ या संकेतस्थळावर मिळू शकेल. तसेच योगेश मुळ्ये (94220 56929), सुहास ठाकूरदेसाई (98222 90859), अभिजित करंबेळकर (94210 79454) किंवा गीता भागवत (8275433735) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button