
माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी मुंबईत प्रचाराला
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोकणवस्ती असलेल्या २१ प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबईकडे रवाना झाले.
केंद्रीय संघटन मंत्री ओमप्रकाश व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या या जबाबदारीच्या अनुषंगाने डॉ. नातू यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांना प्रत्येक प्रभागांची जबाबदारी देवून बोरीवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ, बांद्रे, मुलुंड, कांजूरमार्ग, भांडूप, चेंबूर, साकीनाका, कुर्ला, चुनाभट्टी, माहीम, धारावी, माटुंगा, वरळी या भागात प्रचाराकरिता पदाधिकारी रवाना केले. यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि भाजपचे नेते प्रशांत यादव यांनी पदाधिकार्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.
www.konkantoday.com




