
बेसुमार मासेमारीमुळे माशांच्या विविध प्रजाती दुर्मीळ मच्छीमारांनी केवळ मोठे मासे पकडावे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्तांचे आवाहन
बेसुमार मासेमारीमुळे माशांच्या विविध प्रजाती दुर्मीळ होत चालल्या असून त्यामुळे लहान माशांना वाचवण्यासाठी शासनाने अधिसूचना जारी केली आहे. मच्छीमारांनी केवळ मोठे मासे पकडावे, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी केले आहे.
ते म्हणाले, शाश्वत मच्छीमारीसाठी शासनाने २ नोव्हेंबर २०२३ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. अनेकदा मासे लहान असतानाच पकडले जातात. त्याचा परिणाम माशांच्या प्रजोत्पादनावर होतो. लहान मासे पकडल्यामुळे पुढील वर्षी माशांचे प्रमाण कमी होते. या कारणामुळे पारंपरिक मासेमारी करणार्या मच्छीमार बांधवांच्या हिताचे संरक्षण करणे, मत्स्य साठ्याचे संवर्धन करणे अशा हेतूने लहान मासे पकडण्यावर शासनाने बंदी घातली आहे.
त्यासाठी ५४ प्रजातींच्या माशांचे आकारमान ठरवण्यात आले. माशांची पिल्ले पकडल्यास घाऊक विक्रेत्यांना ५० हजार ते ५ लाख, तर किरकोळ विक्रेत्यांना माशांच्या किंमतीच्या ५ पट दंड भरावा लागणार आहे. ठिपकेदर कोळंबी (कापशी) ११० मिमी, ब्ल्यू क्रॅब (नील खेकडा) ९० मिमी वाळूतील लॉबस्टर (फटफटी) १५० मिमी, ग्रे शार्पनोज शार्क (मुशी) ५३० मिमी, काळा पापलेट (हलवा) १७० मिमी, स्पॉटेड सिर’ (सुरमई) ३७० मिमी आदी प्रजातींच्या माशांचे आकारमान जिल्ह्यातील सर्व मच्छीमारी संस्थाना कळविण्यात आले आहे. कमी आकारातील माशांचे संवर्धन व्हावे, यांसाठी शासन प्रयत्नशीन आहे.www.konkantoday.com




