भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री


भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झाले असून, नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आदिती तटकरे या उत्सुक होत्या, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले हे उत्सुक होते. त्यामुळे अद्यापपर्यंत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झाला नव्हता. परंतु आता भरत गोगावले यांनी बाजी मारली असून, रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टला भरत गोगावले यांनीच ध्वजारोहण केलं होतं.त्यावेळी बोलताना त्यांनी आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असे संकेत दिले होते, आणि आता भरत गोगावले यांचा हा दावा खरा ठरला आहे, रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान भरत गोगावले हे सध्या दिल्लीमध्ये असून, दिल्लीतील मीना बाजार इथे पर्यटन विभागाच्या कार्यक्रमाला भरत गोगावले यांची हजेरी लावली आहे, ते आज रात्री उशिरा मुंबई दाखल होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button