संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये एक्स-रे मशिनची सुविधा बंद


संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयातील एक्स-रे मशिन गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने रूग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेले हे ग्रामीण रूग्णालय तसेच ट्रॉमा केअर सेंटर अपघातग्रस्त रूग्णांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, अत्यावश्यक असलेली एक्स-रे तपासणीची सुविधा बंद असल्याने रूग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी अनेक रूग्णांना संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले जाते. मात्र एक्स-रे मशिन नादुरूस्त असल्याने रूग्णांना पुढील तपासणीसाठी अन्य शासकीय अथवा खाजगी रूग्णालयात पाठवावे लागत आहे. यामुळे उपचारात विलंब होत असून रूग्णांच्या नातेवाईकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button