कोकण वासियांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग अखेर मार्गी लागणार


अनेक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेने जोडण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाला पुढील वर्षी २०२७ साली प्रारंभहोणार आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदीपैकी ३० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यातून कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गालाकेंद्र शासनाचा हिस्सा असलेल्या ३ हजार ४११ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद होणार आहे. त्यासह राज्य शासनही आपला हिस्सा तत्काळ देणार असून लवकरच या मार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडावे ही गेल्या ४० वर्षापासूनची मागणी होती. २५ फेब्रुवारी २०१६ रोजी रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ३ हजार २४४ कोटींच्या या मागीला मंजुरी देत निधीचीही तरतूद केली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या हिस्सेदारीतून हा प्रकल्प उभारला जाईल, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. यानंतर या मागीचे सर्व्हेक्षण, डीपीआर, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आदी विविध प्रक्रिया पूर्ण झाल्या. मात्र, याकरिता तब्बल पावणेदहा वर्षांचा कालावधी गेला. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ५५ हजार ४४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button