
पद्म पुरस्कारांची मोठी घोषणा! तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान
25 जानेवारील पद्म पुरस्काराची मोठी घोषणा करण्यात आली. प्राजसत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला म्हणजेच एक दिवस आधी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार 2026 ची घोषणा केली आहे.सुमारे 45 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रासाठी देखील यात आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांचा देखील पद्म पुरस्काराने सन्मान होणार आहे. रघुवीर गेल्या अनेक वर्षांपासून लोकनाट्य कलाकार म्हणून काम करतात. त्यांना मिळालेला हा पद्मश्री पुरस्कार लोकनाट्य तसंच तमाशा कलाकरांसाठी मिळालेली पोचपावती आहे.
रघुवीर खेडकर हे गेल्या अनेक वर्षापासून लोककलावंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी शाहीर, सरदार, लोकनाट्यांत तमाशा अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांनी त्यांच्या नाटकामधून समाजप्रभोधनासह मनोरंजनाचा देखील ठसा उमटवला. तसंच त्यांनी नेहमीच परखडपणे तमाशा कलावंताची बाजू देखील मांडली.
रघुवीर खेडकर यांच्यासह अर्मिडा फर्नांडिस, भगवानदास रायकर, भिक्ल्या लाडक्या धिंडा, ब्रिजलाल भट्ट, अंके गौडा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच परभणीतील श्रीरंग लाड यांनी कापूस पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी वेगळं संशोधन केल्यानं त्याच दखल घेत त्यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.




