जिल्हास्तरावर चाचा नेहरु बालमहोत्सवाचे मंगळवारी उद्घाटन


रत्नागिरी, दि.5 ) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित बालकांसाठी जिल्हास्तरावर चाचा नेहरु बाल महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा न्यायाधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम. अंबाळकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती एस.एस.पिंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर.पाटील, प्रथम न्यायदंडाधिकारी तथा प्रधान न्यायदंडाधिकारी बाल न्याय मंडळ श्रीमती ए.डी.गाडे, मुख्याधिकारी वैभव गारवे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लिनाथ कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, बाल न्याय मंडळ सदस्या विनया घाग, बालकल्याण समिती सदस्य रजनी सरदेसाई, ॲङ प्रिया लोवलेकर, शिरीष दामले आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या महोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button