भारतीय सैन्य व स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांच्यातील सामंजस्य कराराचे नुतनीकरणमाजी सैनिकांनी (डीएसपी) खाते (डीपीपी) मध्ये बदल करुन घ्यावे


रत्नागिरी, दि. 21 ): भारतीय सैन्य व स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांच्यातील सामंजस्य कराराचे नुतनीकरण झाले आहे. हा करार 15 जानेवारी 2028 पर्यंत म्हणजेच तीन वर्षांसाठी वैध राहणार आहे. या करारांतर्गत एसबीआय च्या डीएसपी खातेदार सेवारत सैनिक (जेंटलमन कॅडेटसह) व पेन्शनधारक (डीपीपी) खातेधारकांना विविध विमा व अर्थिक लाभ लागू राहणार आहेत. तरी सर्व माजी सैनिकांनी आपले (डीएसपी) खाते (डीपीपी) खात्यामध्ये बदल करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.
या करारामुळे सेवारत सैनिकांना अपघाती मृत्यू विमा संरक्षण ₹1 कोटी तर पेन्शनधारकांना ₹50 लाख, सेवारत सैनिकांना अपघाती अपंगत्वाच्या बाबतीत अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार ₹1 कोटीपर्यंत विमा संरक्षण, एसबीआय डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे तिकीट खरेदी केल्यास व्यावसायिक विमान-प्रवासासाठी ₹1 कोटी 50 लाख एअर अॕक्सिडेंट इन्शुरन्स, अपघाती मृत्यू झाल्यास सेवारत सैनिकांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मुलास ₹8 लाख व मुलीस ₹10 लाख (वय 18 ते 25 वर्षे), अपघाती मृत्यू झाल्यास पेन्शनधारकांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ₹5 लाख (वय 18 ते 25 वर्षे), अपघाती मृत्यूच्या प्रकरणात मुलीच्या विवाहासाठी सेवारत सैनिकांना प्रत्येकी ₹5 लाख (कमाल ₹10 लाख) व पेन्शनधारकांना ₹5 लाख, शिक्षणासाठी ₹40 लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज सुविधा, सेवा/लढाई/चार्टर्ड विमान प्रवास.
तसेच विभागाकडून दिलेल्या तिकिटांवर प्रवास केल्यास एअर अॕक्सिडेंट इन्शुरन्स, सेवारत सैनिकांसाठी नैसर्गिक (अपघात नसलेल्या) मृत्यूच्या बाबतीत ₹10० लाखांचे ग्रुप टर्म लाइफ इन्शुरन्स (वय 18 ते 65 वर्षे किंवा निवृत्तीपर्यंत), कुटुंबीयांसाठी स्वतंत्र शून्य शिल्लक खात्यावर ₹5 लाखांचा अपघात विमा, मृत्यू प्रकरणात दोन कुटुंबीयांच्या प्रवासासाठी रुपये पन्नास हजार पर्यंत खर्चाची तरतूद, गंभीर अपघातात एअर अॕम्ब्युलन्ससाठी ₹10 लाखांपर्यंत खर्चाची तरतूद, अपघातानंतर 48 तासांनंतर कोमामध्ये मृत्यू झाल्यास ₹5 लाखांचे अतिरिक्त संरक्षण, पार्थिव परत आणण्यासाठी रुपये पन्नास हजार पर्यंत खर्चाची तरतूद, आयात औषध वाहतुकीसाठी ₹५ लाखांपर्यंत खर्चाची सुविधा इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या कराराची माहिती एडीएन व एडीजी पीएस/पीएस वेबपेज वर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी customercare@sbi.co.in, contactcentre@sbi.co.in किंवा पीएस-३ हेल्पलाईन क्रमांक 9266239674 वर संपर्क साधता येईल. तरी सर्व माजी सैनिकांनी आपले खाते (डीपीपी) मध्ये बदल करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button