
जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त सोमवारी बाईक रॅली
रत्नागिरी, दि. २८ ):- जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त एड्सविषयी जनजागृती करणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून एचआयव्ही तपासणीस प्रोत्साहित करण्यासाठी १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली जिल्हा शासकीय रुग्णालय येथून सुरु होवून जयस्तंभ मार्गे एसटी स्टँड येथे वळसा घेवून साळवी स्टॉप मार्गे पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे समाप्त करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक तथा सदस्य सचिव जिल्हा एड्स नियंत्रण समिती भास्कर जगपात यांनी कळविले आहे.




