रत्नागिरी येथील मूळचे रहिवासी सुहास शेटये यांचे मुंबई येथे आकस्मित दुःखद निधन


रत्नागिरी शहरातील मूळचे रहिवासी व सध्या मुंबई येथे असलेले सुहास श्रीरंग शेटये यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले

मूळचे रत्नागिरी येथील जयस्तंभ येथील सुहास श्रीरंग शेटे हे नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे होते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चांगल्या पदावर कार्यरत होते त्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती निवृत्तीनंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा येथे घर बांधून अनेक वर्षे वास्तव्य केले होते या ठिकाणी त्यानी अनेक होतकरू मुलांना शिकवण्याचे काम केले होते त्यांचा मुलगा व मुलगी नोकरीनिमित्त मुंबई येथे गेल्यानंतर ते मुंबईत वसई येथे राहत होते शनिवारी त्यांना वसई येथील निवासस्थानी अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु त्या आधीच त्यांचे दुःखद निधन झाले होते त्यांच्यावर काल रविवारी सकाळी आंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी रत्नागिरीतील अनेक नातेवाईक व आंबा येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्यांच्या मागे मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button