
दोन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे कामही वेगात सुरू
. मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत.आता या कामाचा वेग वाढवला असून, धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम ६० टक्के होत आले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच गॅबियन वॉलच्या पायथ्याचे कामही वेगात सुरू असल्याने ही भिंत आताच आकार घेऊ लागली आहे.मुंबई-गोवामहामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षे रखडले असून, विविध टप्प्यावर काम रखडली आहेत.
त्यात परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २३ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत. प्रामुख्याने गेल्या दोन महिन्यांत वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तर दुसऱ्या बाजूला भरावाच्या ठिकाणी रस्ता व संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यासाठी दरडीच्या भागात लोखंडी जाळीच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत.




