
मुंबईकडे जाणारी मंगला एक्सप्रेस आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे – दिवाणखवटीच्या बोगद्यात काही काळ अडकली
मुंबईकडे जाणारी मंगला एक्सप्रेस आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे – दिवाणखवटीच्या दरम्यान तांत्रिक कारणामुळे काही कालावधीसाठी बोगद्यामध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
कॅटल गार्डला मेटलचा तुकडा अडकल्याने हा प्रश्न निर्माण झाला; परंतु कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ कार्यवाही करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना होणार नाही याची काळजी कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली. अर्ध्या तासानंतर ही ट्रेन मार्गस्थ करण्यात आली.




