लांजा बाजारपेठेत ट्रक चालकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा बाजारपेठेत भुलालाल रायली राहणार राजस्थान या ट्रक चालकाचा मृतदेह चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत सापडला.या ट्रकवरील क्लिनर फरारी असल्याने या चालकाचा मृत्यू मागे घातपात की अपघात यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.सदरचा ट्रक राजस्थानातून गोवा येथे जात होता लांजा बाजारपेठेत एका बाजूला हा ट्रक बंद अवस्थेत सापडला व त्याच्या बाजूला या चालकाचा मृतदेह छिन्न भिन्न अवस्थेत आढळून आला.या चालकाचा मृत्यू ट्रकमधून पडून त्याच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे झाला आहे का यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.या ट्रकसोबत असलेला क्लिनर फरारी असल्याने या ट्रक चालकांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button