ही शिवराळ भाषा कदाचित एका राऊतांकडून दुसरे राऊत शिकले असतील-दीपक केसरकर

काहीतरी येऊन भाषण करायचे, काहीतरी शिवराळ भाषेत बोलायचं याला कोकण म्हणत नाहीत आणि ही शिवराळ भाषा कदाचित एका राऊतांकडून दुसरे राऊत शिकले असतील, असे मला वाटते. आडनाव सारखं असलं म्हणून तसं घाणेरडे बोललं पाहिजे असं नाही.ताटामध्ये घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही, अशी टीका दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर केली.रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्र्यांनी वेंगुर्ला शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी केसरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केसरकर म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ला तालुक्याचा असणार आहे. ही निवडणूक विकासाची लढाई आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button