
*जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे सुरू असलेल्या महारक्तदान कॅम्पमध्ये केवळ दोन दिवसांत १९६४९ रक्त कुपिकांचे संकलन*
_____जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे सुरू असलेल्या महारक्तदान कॅम्पमध्ये शनिवार व रविवार आशा केवळ दिन दिवसांत १९६४९ रक्त कुपिकांचे संकलन झाले. २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हे कॅम्प चालणार आहेत.संस्थानच्या महारक्तदान कॅम्पला स्व-स्वरूप संप्रदाय व लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. १० व ११ या दोन दिवसांतच १९६४९ कुपिका रक्तसंकलन झाले. सर्व विभागात रक्तदानासाठी मोठी गर्दी झाली होती. उपपीठ उत्तर महाराष्ट्रात १६ कॅम्प झाले. त्यात १३६४ कुपिका रक्त संकलन झाले. *उपपीठ पश्चिम महाराष्ट्रामध्ये रक्तदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या विभागात ऐकून ५४ कॅम्प झाले. त्यात ५१४७ कुपिका रक्तसंकलन झाले. तेलंगणा येथील एका कॅम्पमध्ये ३३ कुपिका रक्त संकलन झाले.उपपीठ मराठवाडा विभागात ४४ कॅम्प झाले त्यात ४४३४ कुपिका रक्त संकलन झाले. मुख्य पीठ नाणीज विभागात २८ कॅम्प झाले. त्यामध्ये २५१७ कुपिका रक्तसंकलन झाले. यामध्ये कोल्हापूर व रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे. पूर्व व पश्चिम विदर्भ पीठ विभागात ऐकून १४ कॅम्प होऊन त्यात ११४४ कुपिका रक्तसंकलन झाले. गोवा उपपीठमध्ये ५ कॅम्प झाले, त्यात २७२ कुपिका रक्तसंकलन झाले. या विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. मुंबई उपपीठातर्फे त्या विभागात ४१ कॅम्प झाले. त्यात ४७३८ कुपिका रक्तसंकलन झाले.हे कॅम्प २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.www.konkantoday.com